NMU Recruitment 2025: Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University has published an official notification for the recruitment of various posts. A total of 19 vacancies will be filled. Under this recruitment, the posts of Senior Coder, Female Medical Officer, Legal and Right to Information Officer, Public Relations Officer, Library Trainee, Library Assistant, Technical Assistant, Technical Operator, Life Guard, Sports Instructor, Trained Junior Engineer, Trained Assistant Engineer, Coder will be filled. Interested candidates have to apply online/offline. The last date for online application is 11 April 2025. Also, the hard copy of the online application should be sent to the university address before 17 April 2025. We will know more information related to this NMU Recruitment 2025 from this article. For such new job information, visit Maha Job Alert (https://mahajobalert.in/) regularly.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ भरती २०२५:
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. त्यानुसार एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत वरीष्ठ पुर्वलेखक (Coder), महिला वैद्यकीय अधिकारी, विधी व माहितीचा अधिकार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, लायब्ररी ट्रेनी, ग्रंथालय सहायक, तांत्रिकी सहायक, टेक्निकल ऑपरेटर, लाईफ गार्ड, क्रीडा प्रशिक्षक, प्रशिक्षित कनिष्ठ अभियंता, प्रशिक्षित सहायक अभियंता, पुर्वलेखक पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 11 एप्रिल 2025 आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी 17 एप्रिल 2025 पूर्वी विद्यापीठाच्या पत्त्यावर पाठवावी. या भरती संबंधित अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अशाच नव-नवीन नोकरी विषयक माहितीसाठी महा जॉब अलर्ट (https://mahajobalert.in/) ला नियमित भेट द्या.
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Recruitment 2025:
संस्थेचे नाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU University) |
पदाचे नाव | पुढे नमूद केले आहेत |
पदसंख्या | 19 |
नोकरीचे ठिकाण | जळगाव |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन / ऑफलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | ११ एप्रिल २०२५ |
अधिकृत वेबसाईट | nmu.ac.in |
Eligibility criteria (शैक्षणिक पात्रता):
पदानुसार उपलब्ध जागा, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव इ. तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. वरिष्ठ पूर्वलेखक (Coder):
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: MCA, M.Sc. (Computer Science/Information Technology), किंवा M.E./MTech (Computer Science/Information Technology) किंवा B.E./B.Tech (Computer Science/Information Technology).
- अनुभव: ASP.NET (Web Forms/MVC/Core), C#, आणि SQL Server वापरून वेब ॲप्लिकेशन्स डिझाइन, विकसित आणि देखरेख करण्याचा ४+ वर्षांचा अनुभव. डेव्हलपर्सच्या टीमचे नेतृत्व करण्याची, कार्ये सोपवण्याची आणि प्रकल्प अंमलबजावणीचे निरीक्षण करण्याची क्षमता. RESTful APIs विकसित करण्याचा आणि थर्ड-पार्टी सेवा एकत्रित करण्याचा अनुभव. व्हर्जन कंट्रोल सिस्टम्स (उदा. Git) चा प्रत्यक्ष अनुभव. ASP.Net 3.5/4.0/4.5 सह वेब-आधारित ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचे चांगले ज्ञान आवश्यक.
२. पूर्वलेखक:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: MCA, M.Sc. (CS)/M.Sc.(IT), B.E. (CSE/IT), B.Tech. (CSE/IT), M.E. (CSE/IT), MTech (CSE/IT) किंवा समकक्ष.
- अनुभव: ASP.Net 3.5/4.0/4.5, SQL Server 2005/2008, JavaScript, MS Light Switch, XML, HTML, CSS, Android Mobile Application Development आणि युनिकोड टायपिंगचे चांगले ज्ञान आवश्यक.
३. कुशल परिचर (संगणक दुरुस्ती व देखभाल कामासाठी):
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: पदविका/पदवी उत्तीर्ण, संगणक विषय सॉफ्टवेअर/हार्डवेअर/नेटवर्किंग अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- अनुभव: शासकीय/ निमशासकीय/ खाजगी कार्यालयातील सॉफ्टवेअर/ हार्डवेअर/ नेटवर्किंगचा प्रत्यक्ष कामाचा २ वर्षे अनुभव आवश्यक.
४. महिला वैद्यकीय अधिकारी:
- पद संख्या: २
- शैक्षणिक अर्हता: कायद्याने स्थापित विद्यापीठाची बॅचलर पदवी (M.B.B.S.). P.G. पदवी किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य किंवा इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रॅक्टिशनरचा (सरकारी/ निमसरकारी/ मान्यताप्राप्त वैद्यकीय सल्लागार रुग्णालय) पाच वर्षांचा अनुभव. किंवा कायद्याने स्थापित विद्यापीठाची बॅचलर पदवी (B.A.M.S.). इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रॅक्टिशनरचा (सरकारी/ निमसरकारी/ मान्यताप्राप्त वैद्यकीय सल्लागार रुग्णालय) पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
५. विधी व माहितीचा अधिकार अधिकारी:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: विद्यापीठाचा कायद्याचा पदवी/पदव्युत्तर पदवीधर किमान ५५% गुण/CGPA B+ श्रेणी धारक व सनदधारक असावा. (त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी).
- अनुभव: जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा पदवीधारकास किमान ७ वर्षांचा व पदव्युत्तर पदवीधारकास ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवार सेवाविषयक, प्रशासनासह अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे तो कायदे विषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
६. जनसंपर्क अधिकारी:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: पदव्युत्तर पदवी (एम.सी.जे./एम.ए. मास कम्युनिकेशन पब्लीक रिलेशन्स). एम.एस.सी.आय.टी.
- अनुभव: शासकीय/ नियमशासकीय/ शैक्षणिक क्षेत्रातील/ शासन मान्य दैनिक वृत्त पत्र/ जनसंवाद माध्यम (छपाई/ दूरदर्शन/ नभोवाणी इत्यादी) क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
७. Executive on Special Duty (TDS/GST):
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: Chartered Accountants (CA) फायनलला बसलेले किंवा CA फायनल पूर्ण केलेले असावे.
- अनुभव: नामांकित CA फर्ममध्ये SAP वातावरणात ३ वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण केलेली असावी.
८. Executive on Special Duty (Purchase):
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: BBA/MBA फायनान्स किंवा M.Com. (टॅक्सेशन).
- अनुभव: १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या SAP वातावरणातील फर्ममध्ये २ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा.
९. कार्यकुशल तज्ञ:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: वाणिज्य/ व्यवस्थापन/ संगणक/ अभियांत्रिकीमधील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावे.
- अनुभव: सुमारे २-३ वर्षांसाठी SAO – FICO मॉड्यूल वापरण्याचा कार्यात्मक अनुभव असावा.
१०. Executive on Special Duty In Ph.D:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: १) CA आर्टिकलशिप पूर्ण. २) CA आर्टिकलशिप पूर्ण + CA इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव: दोन्ही परिस्थितीत एक्सेलचे कामकाज ज्ञान अनिवार्य आहे.
११. Executive on Special Duty In PM – Usha:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: B.Com/ M.Com/ MBA फायनान्स.
- अनुभव: CA फर्ममध्ये ३ वर्षांचा अनुभव किंवा उद्योगात अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचा ३ वर्षांचा अनुभव. बँकेत ३ वर्षांचा अनुभव. एक्सेलचे कामकाज ज्ञान असावे.
१२. लायब्ररी ट्रेनी:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: १. M.L.I.Sc. (Master of Library and Information Sci.), २. मराठी व इंग्रजीचे योग्यप्रकारे टायपिंग येणे गरजेचे आहे. ३. ICT (Information Communication Technology) चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अनुभव: ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
१३. ग्रंथालय सहाय्यक:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: १. M.L.I.Sc. (Master of Library and Information Sci.), २. मराठी व इंग्रजीचे योग्यप्रकारे टायपिंग येणे गरजेचे आहे. ३. ICT (Information Communication Technology) चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अनुभव: ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
१४. तांत्रीकी सहाय्यक:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून डिप्लोमा (CSE/IT) किंवा समकक्ष, MS-CIT, इंग्रजी टायपिंग, इंग्रजी आणि मराठी शॉर्ट हँड उत्तीर्ण असावे.
- अनुभव: इंग्रजी आणि मराठीचे चांगले ज्ञान, वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, डेटाबेस आणि इतर संबंधित रेकॉर्ड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरण्याचा अनुभव, कामाचा दबाव हाताळण्यास आणि कठीण वेळेत काम करण्यास सक्षम आणि टीममध्ये चांगले काम करण्यास सक्षम असावे. FESEM, XRD, AFM मशीनवर परिणाम/नमुन्यांचे विश्लेषण हाताळण्याचा आणि त्याचा अर्थ लावण्याचा संशोधन अनुभव किंवा कामाचा अनुभव असावा.
१५. टेक्निकल ऑपरेटर:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: B.E./B.Tech. (प्रथम वर्ग) ८ वर्षांचा अनुभव किंवा M.Tech. (प्रथम वर्ग) ५ वर्षांचा अनुभव असावा.
- अनुभव: FESEM, XRD, AFM मशीनवर परिणाम/नमुन्यांचे विश्लेषण हाताळण्याचा आणि त्याचा अर्थ लावण्याचा संशोधन अनुभव किंवा कामाचा अनुभव असावा.
१६. लाईफ गार्ड:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवीधर, लाईफ गार्ड कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असावे.
- अनुभव: ०५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
१७. क्रीडा प्रशिक्षक:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: एम.पी.एङ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावे.
- अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य.
१८. प्रशिक्षित कनिष्ठ अभियंता/प्रशिक्षित सहाय्यक अभियंता:
- पद संख्या: २
- शैक्षणिक अर्हता: बी.ई./एम.ई. सिव्हील प्रथम श्रेणी.
- अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
१९. Internship Co-Ordinator:
- पद संख्या: १
- शैक्षणिक अर्हता: M.B.A/M.C.A/B.Tech /B.E.
- अनुभव: MS Office (word, advance excel) मध्ये प्राविण्य. इंग्रजी आणि मराठीमध्ये (तोंडी आणि लेखी) उत्कृष्ट संवाद कौशल्ये असावे.
Age limit (वयोमर्यादा):
उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षांपर्यंत असावे. शासन नियमानुसार मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट राहील.
हे पण वाचा » महावितरण हिंगोली येथे ८० जागांची भरती; अर्ज सुरु! |
Salary details (पगार):
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार १०,०००/- ते ५०,०००/- रुपये पगार देण्यात येईल.
How to apply for NMU Recruitment 2025:
ऑनलाईन विहित नमुन्यातील अर्ज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे. अर्हताधारक उमेदवारांनी दि. ११/०४/२०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. सदर अर्जाची एक प्रिंट घेवुन अर्जात नमूद शैक्षणीक अर्हता व अनुभव प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकीत प्रत जोडुन एक हार्डकॉपी विद्यापीठ कार्यालयास पोस्टाव्दारे “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव उमविनगर, जळगाव” या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत दि. १७/०४/२०२५ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने पाठवायची आहे.
पात्र व अपात्र उमेदवाराची यादी, मुलाखत वेळापत्रक इ. माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. दिलेल्या वेळापत्रकानुसार पदानुसार आवश्यक दस्तऐवजांच्या मुळ प्रत घेऊन मुलाखतीस उपस्थित रहावे.
अर्जदारांसाठी महत्वाच्या सुचना:
- सदर पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील.
- अर्जासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित केलेल्या सत्य प्रती जोडणे आवश्यक आहे.
- मुलाखतीसाठी अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार राहील.
- अर्जाची स्विकृती किंवा तो नाकारणे याबाबत विद्यापीठामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
- जाहिरातमध्ये नमुद पदे भरणे किंवा न भरणे याचा हक्क विद्यापीठाने राखून ठेवला आहे.
- जाहिरातीतील पदांच्या वेतनात, अनुभव शिथिलता आणि पदसंख्या यात बदल करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत
- वरील पदावर करावयाची नेमणूकही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून, निवड झालेल्या उमेदवारास विद्यापीठाच्या सेवेत हक्क सांगता येणार नाही.
- एकापेक्षा जास्त पदांसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहील.
- अर्जासाठी शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रू २०० व मागास प्रवर्गासाठी रू १०० ऑनलाईन पध्दतीने भरणा करावी.
- एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
- आवश्यक दस्तायेवज च्या प्रती अर्जा सोबत जोडलेल्या नसल्यास सदर चा अर्ज अवैद्य ठरवण्यात येईल.
NMU Recruitment 2025 Notification PDF:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |