महावितरण हिंगोली येथे ८० जागांची भरती; अर्ज सुरु! | Mahavitaran Hingoli Recruitment 2025

Mahavitaran Hingoli Recruitment 2025

Mahavitaran Hingoli Recruitment 2025: Applications are invited online from eligible candidates for filling up a total of 80 posts of Apprentices, Electrical Technicians, 40 and Telecommunication Technicians, for a period of one year under NCVT for the year 2024-2025 at the establishment of Mahavitaran Mandal Office, Vidyut Bhawan, Hingoli. Interested candidates should submit their applications online from 01/04/2025 to 09/04/2025 (05.00 pm) on the website apprenticeshipindia.org under establishment code E02172700057. Applications received after the deadline will not be considered. For such new job related information, visit Maha Job Alert (https://mahajobalert.in/) regularly.

महावितरण हिंगोली भरती 2025:

महावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ करीता प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांच्या NCVT अंतर्गत एक वर्ष कालावधी करीता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीजतंत्री ४० व तारतंत्री ४० अशी एकूण ८० पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी दि. 01/04/2025 ते 09/04/2025 (05.00 pm) वाजेपर्यंत) www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना कोड E02172700057 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराची निवड ही आयटीआय गुणाच्या टक्केवारी (मेरीट) नुसार करण्यात येईल. अशाच नव-नवीन नोकरी विषयक माहितीसाठी महा जॉब अलर्ट (https://mahajobalert.in/) ला नियमित भेट द्या.

Mahavitaran Hingoli Bharti 2025:

संस्थेचे नावमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) हिंगोली.
पदाचे नाववीजतंत्री व तारतंत्री
पदसंख्या80
नोकरीचे ठिकाणहिंगोली
अर्जाची पद्धतऑनलाइन/ ऑफलाइन
अर्जाची शेवटची तारीख09/04/2025
अधिकृत वेबसाईटmahadiscom.in

Eligibility criteria (शैक्षणिक पात्रता):

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री / तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How to apply (अर्ज कसा करावा):

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करतांना SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका (४ सेमिस्टर / वार्षिक) व ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (मागासप्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आवश्यक) रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग ही माहिती अचूक भरण्यात यावी.

आवश्यक मूळ प्रमाणपत्र योग्य रीतीने सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन करून उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर अपलोड करावे. सोबत रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. अपुरे अर्ज किंवा अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अशा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व या बाबत कसल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्राची (शैक्षणिक प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रक, सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवाशी दाखला ईत्यादी साक्षार्कीत सुस्पष्ट छायार्कीत प्रती दि. 09/04/2025 (05.00 pm) वाजेपर्यंत महावितरण मंडळ कार्यालय, बस स्टँड जवळ, अकोला रोड हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर करावे.

वरील प्रमाणे नमुद कागदपत्रांच्या छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवाराने पोर्टल वर रजिष्ट्रेशन करणे व ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. इतर मार्गाने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Age limit (वयोमर्यादा):

अर्जदाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे, मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट देण्यात येईल.

Salary (पगार):

निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे ₹6,000 – ₹9,000 मानधन देण्यात येईल.

हे पण वाचा » NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीत 182 जागांची भरती

अर्जदारासाठी महत्वाच्या सूचना:

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना सद्यस्थितीत चालु असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अचुक नमुद करावा. या कार्यालयाकडून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाही बाबत अवगत करण्यात येईल.

मुळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी ऑनलाईन प्रणालीत अपलोड केलेल्या कागदपत्रात काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवाराची निवड कुठल्याही टप्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Mahavitaran Hingoli Recruitment 2025 Notification PDF:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा