नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांची मोठी भरती | Navi Mumbai Mahanagar palika Bharti 2025

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Navi Mumbai Mahanagar palika Bharti 2025: Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has published a recruitment advertisement to fill various posts in Group-C and Group-D categories. Candidates who fulfill the educational qualifications and other conditions have been urged to apply online. This recruitment will be for a total of 620 posts. Eligible candidates who wish to apply for this recruitment should apply online on the website https://nmmc.gov.in/ by 11:55 pm on May 11, 2025. For such new job information, visit Maha Job Alert (https://mahajobalert.in/) regularly.

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५:

नवी मुंबई येथे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका यांनी गट- क व गट- ड प्रवर्गातील विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. ही भरती सरळसेवा प्रक्रियेद्वारे राबविण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार शैक्षणिक पात्रता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.

या भरती अंतर्गत भरण्यात येणारी पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय, इत्यादी सेवेमधील आहेत. प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार गट- क व गट- ड प्रवर्गातील एकूण 620 पदांकरिता ही भरती होणार आहे. या भरतीसाठी 28 मार्च 2025 पासून ते दिनांक 11 मे 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://nmmc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11 मे 2025 रोजी रात्री 11:55 मिनिटांपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 संबंधित अधिक सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अशाच नव-नवीन नोकरी विषयक माहितीसाठी महा जॉब अलर्ट (https://mahajobalert.in/) ला नियमित भेट द्या.

NMMC job vacancy 2025:

संस्थेचे नावनवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
पदाचे नावखाली नमूद केलेले आहेत
पदसंख्या620
नोकरीचे ठिकाणनवी मुंबई
अर्जाची पद्धतऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख11/05/2025
अधिकृत वेबसाईटnmmc.gov.in

Navi Mumbai Mahanagar Palika vacancy 2025:

Post NameVacancies
Biomedical Engineer1
Junior Engineer (Civil)35
Junior Engineer (Biomedical Engineering)6
Horticulture Superintendent1
Assistant Information and Public Relations Officer1
Medical Social Worker15
Dental Hygienist3
Staff Nurse/Nurse Midwife (G.N.M.)131
Dialysis Technician4
Statistical Assistant3
ECG Technician8
C.S.S.D. Technician (Central Surgical Supervision Department)5
Dietary Technician1
Ophthalmic Assistant1
Drug Manufacturer/Drug Manufacturing Officer12
Health Assistant (Female)12
Biomedical Engineer Assistant6
Livestock Supervisor2
Auxiliary Nurse Midwife (A.N.M.)38
Multipurpose Health Worker (Heat)51
Operating Room Assistant15
Assistant Librarian8
Wireman2
Sound Operator1
Gardening Assistant4
Clerk-Typist135
Accounting Clerk58
Autopsy Assistant4
Clerk/Nanny28
Clerk (Wardboy)29
Total620

NMMC recruitment 2025 Eligibility criteria:

  • बायोमेडिकल इंजिनिअर: बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी/पदविका, 2 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअर): बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी/पदविका, 2 वर्षे अनुभव.
  • उद्यान अधिक्षक: कृषी/वनस्पतीशास्त्र पदवी.
  • सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी: पदवी, पत्रकारिता पदविका, 3 वर्षे अनुभव.
  • वैद्यकीय समाजसेवक: समाजशास्त्र पदव्युत्तर पदवी/एम.एस.डब्ल्यू, 2 वर्षे अनुभव.
  • डेंटल हायजिनिस्ट: 12वी विज्ञान, दंत आरोग्य तज्ञ परीक्षा, 2 वर्षे अनुभव.
  • स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ: बी.एस्सी. (नर्सिंग)/जी.एन.एम, 2 वर्षे अनुभव.
  • डायलिसीस तंत्रज्ञ: विज्ञान पदवी/डी.एम.एल.टी, डायलिसीस अभ्यासक्रम, 2 वर्षे अनुभव.
  • सांख्यिकी सहाय्यक: सांख्यिकी पदवी, 2 वर्षे अनुभव.
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स पदवी, ई.सी.जी. प्रशिक्षण, 2 वर्षे अनुभव.
  • सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ: सूक्ष्मजीवशास्त्र पदवी, 2 वर्षे अनुभव.
  • आहार तंत्रज्ञ: फूड अॅण्ड न्युट्रीशन/न्युट्रोशन अॅण्ड डाएटीशियन पदवी/पदव्युत्तर पदवी, 2 वर्षे अनुभव.
  • नेत्रचिकित्सा सहाय्यक: 12वी विज्ञान, ऑप्थॉल्मिक असिस्टंट/ऑप्टीमेट्री पदवी/पदविका, 2 वर्षे अनुभव.
  • औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी: बी.फार्म, नोंदणी प्रमाणपत्र, 2 वर्षे अनुभव.
  • आरोग्य सहाय्यक (महिला): 12वी विज्ञान, 2 वर्षे अनुभव, प्रशिक्षण.
  • बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक: 10वी, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक अभ्यासक्रम, 2 वर्षे अनुभव.
  • पशुधन पर्यवेक्षक: 12वी, पशुसंवर्धन पदविका, 2 वर्षे अनुभव.
  • ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ: 10वी, ए.एन.एम., नोंदणी.
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी: 12वी विज्ञान, प्रशिक्षण.
  • शस्त्रक्रियागृह सहाय्यक: 12वी विज्ञान, 2 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक ग्रंथपाल: ग्रंथालय पदवी.
  • वायरमन: 10वी, तारातंत्र्य अभ्यासक्रम, एन.सी.टी.व्ही.टी., 3 वर्षे अनुभव.
  • ध्वनी चालक: 10वी, रेडिओ/टि.व्ही. अभ्यासक्रम.
  • उद्यान सहाय्यक: कृषी/वनस्पतीशास्त्र पदवी.
  • लिपीक-टंकलेखक: पदवी, टंकलेखन प्रमाणपत्र.
  • लेखा लिपीक: वाणिज्य पदवी, टंकलेखन प्रमाणपत्र.
  • शवविच्छेदन मदतनीस: 10वी, 2 वर्षे अनुभव.
  • कक्षसेविका/आया: 10वी, 2 वर्षे अनुभव.
  • कक्षसेवक: 10वी, 2 वर्षे अनुभव.
हे पण वाचा » उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती; १० ते ५० हजार पगार

Navi Mumbai Mahanagar palika Bharti 2025 Age limit:

प्रवर्गवयोमर्यादा
अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठीकिमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठीकिमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे

NMMC recruitment 2025 Salary:

पदाचे नाववेतनश्रेणी (रुपये)
बायोमेडिकल इंजिनियर41800-132300
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)38600-122800
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)38600-122800
उद्यान अधिक्षक38600-122800
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी38600-122800
वैद्यकीय समाजसेवक38600-122800
डेंटल हायजिनिस्ट35400-112400
स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)35400-112400
डायलिसिस तंत्रज्ञ35400-112400
सांख्यिकी सहाय्यक35400-112400
इसीजी तंत्रज्ञ35400-112400
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)35400-112400
आहार तंत्रज्ञ35400-112400
नेत्र चिकित्सा सहाय्यक29200-92300
औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी29200-92300
आरोग्य सहाय्यक (महिला)29200-92300
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक25500-81100
पशुधन पर्यवेक्षक25500-81100
ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)25500-81100
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)25500-81100
शस्त्रक्रियागृह सहाय्यक21700-69100
सहाय्यक ग्रंथपाल21700-69100
वायरमन (Wireman)19900-63200
ध्वनीचालक19900-63200
उद्यान सहाय्यक19900-63200
लिपीक-टंकलेखक19900-63200
लेखा लिपिक19900-63200
शवविच्छेदन मदतनीस15000-47600
कक्षसेविका/आया15000-47600
कक्षसेवक (वॉर्डबॉय)15000-47600

Navi Mumbai Mahanagar palika Bharti 2025 Important dates:

तपशील दिनांक
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांकदि. 28/03/2025
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकदि.11/05/2025, वेळ रात्री 11.55 पर्यंत
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदतदि.11/05/2025
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांकपरीक्षेच्या 7 दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक (प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार)नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

NMMC Bharti 2025 application fees:

प्रवर्गआकारण्यात येणारे शुल्क
मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग900 रुपये
खुला प्रवर्ग1000 रुपये

Navi Mumbai Mahanagar palika jobs 2025 apply online:

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. उमेदवारास अर्ज सादर करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास, नवी मुंबई महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभागाच्या ०२२-२७५६७१८९ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

NMMC recruitment 2025 notification:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा